केबीसी लॉटरी लागल्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – केबीसीमध्ये एक कोटी 67 लाख रुपयांची गाडी दुबई येथून लागली असल्याचे सांगत एका व्यक्तीची 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 23 मार्च ते 31 मे या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

चिंचवडगावातील ओपन जिमचे शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण

विनायक दामोदर चौधरी (वय 45, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 19) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8889365066, 7352003446, 9933749775, 8830946022, 6385418417,6391711727 या क्रमांकावरून संपर्क करणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या क्रमांकावरून व्हाट्सअप वर फिर्यादीस फोन केले. तुम्हाला केबीसी कडून एक कोटी 67 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. बीएमडब्ल्यू कंपनीची एक कोटी 67 लाख रुपयांची गाडी दुबई येथून बक्षीस मिळणार आहे, असे फिर्यादीस सांगण्यात आले. या आमिषाने फिर्यादी कडून आरोपींनी वेळोवेळी 13 लाख 50 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेत त्यांना बक्षिसाची रक्कम, गाडी न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.