चिंचवडगावातील ओपन जिमचे शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंचवड गावठाण येथील श्री गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये ओपन जिम आणि व्यायामाचे इतर साहित्य बसवण्यात आले आहे. या ओपन जिमचे भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Atrocity Case Filed: फेसबुक लाईव्हवर जातीवाचक कमेंट करणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, भाजयुमो प्रदेश सदस्य अजित कुलथे, पिंपरी-चिंचवड भाजप सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, विजय गावडे, श्री गजानन हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, राजेश येवलेकर, नितीन पवार, गणेश थोरात, आण्णा भोसले, दीपक परकाळे, शंकर देशमुख, दीपक पराठे तसेच सोसायटीमधील रहीवाशी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम हवा असतो. कोरोनाच्या संकटाने संपूर्ण मानवजातीलाच सदृढ शरीराचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. निरोगी आयुष्य जणू सर्वांसाठीच महत्वाचे बनले आहे. नागरिकांना आपल्या घराच्या बाहेरच व्यायामाचे साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीथून ओपन जिम उभारण्यात आले आहे. ओपन जिम ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. ओपन जिम हे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी देखील महत्त्वाचे आहे. त्याचा सोसायटीतील प्रत्येकाने आनंद घ्यावा. इथल्या साहित्याची कुणाकडून नासधूस होणार नाही याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.