Atrocity Case Filed: फेसबुक लाईव्हवर जातीवाचक कमेंट करणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती व हिंदू मातंग सेना या संघटनेचा बॅनर प्रकाशान सोहळा फेसबुकवर 14 नोव्हेंबर रोजी लाईव्ह दाखवण्यात आला यावेळी या लाईव्हवर एकाने जातीवाचक कमेंट केली. या कंमेंट करणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.19) अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Daund News: दौंड येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

याप्रकरणी गजानन उर्फे तात्या लक्ष्मण सोनोने (वय 42 रा.पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कमेंट करणारा बलवंत शेगोकर (ऑफीसचा पत्ता – पाचपाखडी, ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनोने यांच्या फेसबुक लाईव्हवरून हा बॅनर प्रकाशनाचा सोहळा सुरु होता. यावेळी आरोपीने कार्यक्रमावर जातीवाचक कमेंट केली. याचा फिर्यादीने जाब विचारला असता मोबाईलवर फिर्यादीस जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.