Pimpri News : तडीपार गुंडाने कोयत्याने वार करत लुटले

एमपीसी न्यूज – तडीपार गुंडाने एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत त्याच्या जवळील पैसे लूटून घेऊन गेला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.19) पिंपरी येथील बौद्धनगर परिसरात घडला.

Daund News: दौंड येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

जितेंद्र गंगाराम नलावडे (वय 34 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसांत फिर्याद दिली असून गौतम उर्फ दाद्या दिपक कदम (वय 23 रा.पिंपरी) असे आरोपीचे नाव असून त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे किराणा मालाचे व्यावसायीक असून ते घरी असताना आरोपी त्यांच्या घरात आला व त्याने फिर्यादी यांच्या उजव्या हतावर कोयत्याने वार  केला. कोयत्याचा धाक दाखवून त्याने फिर्यादी यांच्या  दुकानाच्या गल्ल्यातील सातशे रुपये काढून घेऊन गेला.तसेच त्याने फिर्यादी यांच्या आईला देखील मारहाण व शिवीगाळ केली. यपिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर तडीपारी कारवाईचा भंग करणे, मारहाण, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.