Daund News: दौंड येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज : दौंड येथील घडलेल्या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अंकित गोयल यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गुन्हा 547/2022 भादवी कलम 307, 354, 452, 143,147 इतर तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(1)(r)(s),3(2)(v)(a), नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 क 7(1)(d) आर्म ॲक्ट 4, 25 या गुन्ह्यामुळे दौंड शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

या गुन्ह्याचा तपास सूचनेप्रमाणे करत असताना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार केले. या गुन्ह्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या त्याप्रमाणे दौंड पोलीस ठाणेच्या हद्दीत सदर गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती माहिती मिळाली की दौंड पो.स्टे गु. र. नंबर 547/2022 मधील तीन आरोपी हे लोणावळा येथे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून सापळा रचून माहिती मिळालेल्या वर्णनाच्या तीन इसमास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीचे नाव 1) वाहिद जावेद खान, वय 21 वर्षे 2) जुम्मा उर्फ सुफियान रमजान शेख,वय 20 वर्षे 3) इलियास इस्माईल शेख वय 31 वर्षे. सर्व राहणार कुंभार गल्ली दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे आहेत.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीस ताब्यात घेवून त्यांची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उप निरीक्षक सिद पाटील, पो.हवा.सचिन घाडगे, पो.हवा. असिफ शेख, पो.हवा.अजित भुजबळ, पो.हवा.अजय घुले, चा.सहा.फौ. मुकुंद कदम यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.