Pune Crime News : लॉकअप तोडून फरार झालेल्या कुख्यात दरोडेखोर जेरबंद

सिनेस्टाईल पाठलाग करून केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

एमपीसी न्यूज – दरोडा,जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 14 गंभीर गुन्हे असलेला आरोपी नामे चंद्रकांत लोखंडे (वय 32 रा. ढवळ ता. फलटण. जि.सातारा ) हा भोर पोलिसांच्या कोठडीत असताना लॉकअप फोडून 17 फेब्रुवारी रोजी फरार झाला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून मुंबईवरून कर्नाटक याठिकाणी ट्रॅव्हल्स मधून निघाला असताना सिनेस्टाईल पाठलाग करून ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली.

चंद्रकांत लोखंडे हा सराईत गुन्हेगार होता. त्याने पुणे, सातारा, नवी मुंबई जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून सोने चांदी लुटून नेली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तपासादरम्यान त्याला पोलिसांनी नीरा ता. पुरंदर येथून अटक केली होती. त्यानंतर ते या गुन्ह्यात तो भोर येथील लॉकअप असताना 17 फेब्रुवारी लॉकअपचा गज कापून चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत हे लॉकप मधून पळून गेले होते.

याप्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी चंद्रकांत लोखंडे हा मुंबई वरून कर्नाटक याठिकाणी ट्रॅव्हल्स मधून निघाला आहे.अशी खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने मुंबई एक्सप्रेस महामार्गावर या बसचा पाठलाग सुरू केला. चांदणी चौक पास करून ही बस खेडशिवापुरच्या दिशेने पुढे निघाली असता सिनेस्टईल पाठलाग करून खेडशिवापुर या ठिकाणी बस थांबवली. त्यानंतर बसची तपासणी केली असता चंद्रकांत लोखंडे बसमध्ये आढळून आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.