Mobile Theft: पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि.19) मध्यरात्री निगडी-तळवडे रोडवर रुपीनगर येथे घडली.

चिंचवडगावातील ओपन जिमचे शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण

शंभू गोविंद माहिती (वय 27, रा. रुपीनगर, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कंपनीतून पायी चालत घरी जात होते. ते रुपीनगर येथे सार्थक मोटर्सच्या समोर आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादींच्या खिशातून जबरदस्तीने सात हजाराचा मोबाईल फोन काढून चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.