Bhosari : चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. (Bhosari) त्यांच्याकडून 23 मोबाईल फोन, दोन तोळे सोने, एक मोटार सायकल आणि शस्त्र असा एकूण पाच लाख 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमा दुर्गप्पा चौधरी (वय 19, रा. नेहरूनगर पिंपरी), आदित्य सुरेश कोळी (वय 18, रा. नेहरूनगर पिंपरी), मुदस्सर अहमद सय्यद (वय 21, रा. )पिंपरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या जबरी चोरीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एक कडून तपास केला जात होता. दरम्यान एमआयडीसी भोसरी परिसरात तिघेजण रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मोबाईल फोन विकत असल्याची माहिती युनिट एकला मिळाली. (Bhosari) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाईल बाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

Bhosari : भोसरीत टोळक्याची दहशहत; वाहनांची तोडफोड करत वाहन चालकाला लुटले

त्यामुळे त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी भोसरी आणि सांगवी परिसरातून मोबाईल फोन आणि इतर साहित्य चोरी केल्याचे सांगितले.(Bhosari) पोलिसांनी 23 मोबाईल फोन, दोन तोळे सोने, एक मोटार सायकल आणि हत्यार असा एकूण पाच लाख 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सात तर सांगवी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तिन्ही आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारूक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्निल महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर यांच्या पथकाने केली..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.