Bhosari : भोसरीत टोळक्याची दहशहत; वाहनांची तोडफोड करत वाहन चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – कारमधून निघालेल्या एका तरुणाला तिघांनी (Bhosari) मिळून अडवले. कार चालकाला लुटून त्याच्या कारची तोडफोड केली. इतरही वाहनांची तोडफोड करून नुकसान करत दहशत निर्माण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) रात्री दोन वाजताच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे घडला.

सोहेल लाल पठाण (वय 26, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विन्या चव्हाण आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून घरी येत (Bhosari) होते. त्यावेळी रस्त्यावर तिघांनी त्यांची कार अडवली. आरोपी विन्या याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गल्लीतील वाहनांची तोडफोड केली. फिर्यादींना अडवून, ‘मी इथला भाई आहे. तुझ्या खिशातील पैसे काढून दे’ अशी धमकी दिली.

Chakan : पत्नीसह सासरच्या छळाला कंटाळून पतीची जाळून घेत आत्महत्या

फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर परिसरात अन्य वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.