टेस्ट मॅचची आज झाली 140 वर्षाची ; टेस्ट मॅच साजरी करणार शंभरी

एमपीसी न्यूज – सध्या जमाना 20-20 मॅच असला तरी आजही बरेच टेस्ट मॅचचे चाहते आजही पहायला मिळतील. अशा या टेस्ट मॅचची आज शंभऱी पूर्ण झाली आहे. पहिल्या टेस्ट मॅच 15 मार्च 1877 मार्च रोजी इंग्लड व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली टेस्ट मॅचचा सामना रंगला होता. या सामन्याला आज 140 वर्ष पूर्ण झाली आहेत.

आजच्या पिढीला टेस्ट मॅच रटाळ वाटत असल्या तरी आपले आजोबा, बाबा, काका यांना एकदा टेस्ट मॅचबद्दल विचारा ते 5 दिवसात चालणारा तो सामना कसा बघायचा त्याची मजा कशी घ्यायची याची ट्रीक सांगतील. इंटरनॅशनल क्रीकेट कौन्सिलतर्फे 1877 साली झालेला हा पहिला वहीला टेस्ट सामना 15 ते 19 मार्च दरम्यान झाला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 45 धावांनी विजय झाला होता.  हा सामना मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर झाला होता.

या टेस्ट मॅचच्या शंभरी गुगलतर्फेही साजरी केली जात आहे. आजअखेर एकूण 15 प्रसिद्ध टेस्ट मॅच ट्रॉफी खेळल्या जातात. क्रिकेटच्या इतिहासात1877  मध्ये पहिला कसोटी सामना खेळवला गेला असला तरी भारताने मात्र 1932 साली कसोटी खेळायला सुरूवात केली होती. भारतीय संघाने आजवर 510 कसोटी सामने खेळले आहेत. यात 138 सामन्यांत विजय, तर 158 सामने गमावले आहेत. तब्बल 213 सामने अनिर्णित राहिले आहेत.

सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडच्या संघाने आजवर 983 कसोटी सामने खेळले आहेत. यात 351 सामन्यांत विजय, तर 289  सामन्यांत पराभव झाला आहे. बांगलादेशच्या संघाने सर्वात कमी कसोटी सामने खेळले आहेत. बांगलादेशच्या संघाने आजवर फक्त 99 कसोटी सामने खेळले असून यातील केवळ 8 कसोटी सामने त्यांना जिंकता आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.