बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

लोणावळा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आलेली शिवजयंती लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने मावळा पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौकात आकर्षक रोषणाई व स्वागत कमानी लावत शहरात येणार्‍या सर्व शिवज्योतींचे जयचंद चौकात स्वागत केले.

शिवाजी चौकात श्री योद्धा प्रतिष्ठान व हिंदु समितीच्या वतीने शिवाजी चौकात आलेल्या सर्व शिवज्योतींचे स्वागत केले तसेच ज्योत घेऊन येणार्‍या शिवप्रेमींसाठी पिण्याचे पाणी व केळीची सोय केली होती. लोणावळा शहर व परिसरातील जवळपास शंभराहून अधिक मंडळांच्या शिवज्योती लोणावळ्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला अभिवादन करुन गावांकडे मार्गस्थ झाल्या.

कुसगाव येथिल शिवजयंती उत्सव मंडळाने पारंपारिक पद्धतीने पदयात्रा काढली होती. या यात्रेमध्ये बनविलेला भक्तीशक्ती हा जिवंत देखावा लक्षवेधी ठरला. तुंगार्ली गावातील शिवजयंती मंडळाने बनविलेला शिवरायांचा पुतळा लक्षवेधी ठरला. भांगरवाडी, खंडाळा, वलवण, वरसोली, वाकसई, वाकसईचाळ, ओळकाईवाडी, जुना खंडाळा, कुसगाववाडी, इंदिरानगर, रायवुड, ठोंबरेवाडी, मळवली आदी गावांमधील युवकांनी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरुन शिवज्योती आणत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

नगर‍ाध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, शहरप्रमुख राहुल शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, नगरसेवक बाळासाहेब कडू, अशोक कुटे, रुपेश नांदवटे, रमेश म्हाळसकर, भारत चिकणे आदींनी चौकात शिवज्योतींचे स्वागत केले.

spot_img
Latest news
Related news