पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून भाजप कार्यकर्त्याची सभागृहात घुसखोरी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकी दरम्यान महापालिकेच्या सभागृहात नगरसेवका समावेत कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मुखवटा घालून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी सभागृहातील प्रत्येकाला वाटले की नगरसेवक आहे. मात्र त्याचवेळी काही कर्मचा-यांनी चौकशी केली असता कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच बाहेर काढले. यावरून भाजप कार्यकर्त्याची पंतप्रधानाचा मुखवटा घालून सभागृहात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले.

पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून रांगोळी काढण्यात आली होती. तसेच महापालिकेच्या आवारात भाजपच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजनाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. तर महापौरच्या इमारतीवरील प्रत्येक मजल्यावर केळीची खुंटे आणि फुलांच्या माळानी सजवण्यात आली होती. आज निवडणूक होणार असल्याने महापालिकेत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निवडून आलेले नगरसेवक, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिकांची चौकशी करून आतमध्ये प्रवेश देत होते. मात्र याच दरम्यान भाजप च्या सर्व नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. प्रत्येक नगरसेवकाने फेटे घालून आतमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये सर्वात वेगळी वेशभूषा परिधान केली होती. ती म्हणजे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या चेह-याचा मुखवटा परिधान करून सभागृहात सर्व ठिकाणी फिरत होता. तर त्यांच्याबरोबर मुक्ता टिळक आणि काही सभासद फोटो देखील काढले.

तसेच त्याचवेळी सभागृहातील कर्मचा-यांनी चौकशी केली असता. तो कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच बाहेर काढण्यात आले. यामुळे निवडणुकी दरम्यान सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कारण सभागृहात प्रवेश करताना प्रत्येकाची कसून चौकशी करून आतमध्ये प्रवेश दिला कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.