Wakad : जांबे – आळंदी बस पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा …..

एमपीसी न्यूज : मागील सहा महिन्यापुर्वी अचानक बंद करण्यात आलेली जांबे – आळंदी बस सेवा काल सोमवार (दि.23) रोजी पुन्हा सूरू केल्याने जांबे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

प्रवाशी संख्या कमी असल्याने उत्पनाचे कारण पुढे करत ही बस सेवा काही महिन्यापुर्वी बंद करण्यात आली होती , सध्या जांबे ते डांगे चौक बस सेवा सुरू आहे मात्र जांबे आणी आजुबाजुच्या वाड्या वस्त्यांना चिंचवड , पिंपरि , भोसरी , आळंदी ईत्यादी भागात जाण्यासाठी दळन वळनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक , विद्यार्थी , शिक्षक व नोकरदार वर्ग यांचे हाल होत होते खास करूण या परिसरात वारकरी सांप्रदाय क्षेत्रातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने जांबे गावातून चिंचवड , पिंपरी मार्गे आळंदी बस सेवा सूरू झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे . यासाठी माजी उपसरपंच आनिल मगर यांनी विद्यमान सरपंच , उपसरपंच आणी ग्रामस्थांच्या मदतिने पाठपुरावा केला होता अखेर चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने ही बस सेवा पुन्हा सूरू करण्यात आली . 

काल सोमवार रोजी बस ची विधीवत पुजा करूण बस सेवा सुरू करण्यात आली .यावेळी सरपंच अंकुश गायकवाड , उपसरपंच शिलाताई मगर , सदस्य गणेश गायकवाड , माजी उपसरपंच आनिल मगर , माजी उपसरपंच बबन गायकवाड , भगवान गायकवाड , राजेंद्र गायकवाड , राजु गायकवाड , संतोष बुचडे , राजाभाऊ विनोदे , रंजना गायकवाड , विजयराव गायकवाड , नवनाथ टेमगिरे , हभप सुमन ताई जगताप तसेच भोसरी डेपो मॅनेजर केदारी व शिक्षक वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी बस सेवा सुरू झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.