Alandi : आळंदी देवाची येथे सोमवारी संत निरंकारी मिशनचा आध्यात्मिक सत्संग सोहळा

एमपीसी न्यूज- निरंकारी सदगुरु माता सविंदर हरदेव सिंहजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने माताजींचे परम शिष्य सांगलीचे शिरीष डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (दि. १७) आळंदी देवाची येथे सत्संग मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आळंदी देवाची येथील नगरपरिषद शाळा क्र. ४ च्या प्रांगणामध्ये हा सत्संग सोहळा पार पडणार असून या सत्संगासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे पुणे परिमंडळाचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे.