Pimpri: महापालिका स्थायीची 19 कोटीच्या विकास कामांना मंजुरी  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 19  कोटी 16 लाख 28 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातांतर्गत डास निर्मुलन उपाय योजनेसाठी औष्णिक धुरीकरण व्हॅन फॉगींगच्या मशीनने करण्याच्या कामासाठी डिझेलवर धावणा-या प्रती दिन चार पिकअप व्हॅन/रिक्षा टेम्पो भाडे तत्वावर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 70 लाख,  ‘क’  प्रभागात विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांचे चर बुजविण्यासाठी येणा-या सुमारे सहा कोटी 88 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक आठ सेक्टर नंबर  एक हॉटेल हवेली मागील परिसरात व इत्यादी ठिकाणी फुटपाथ करुन कलर पेव्हींग ब्लॉक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 32 लाख 46 ४ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 23 मधील पाण्याची टाकी कैलासनगर, समता कॉलनी, शिवशंभो कॉलनी, मोहटादेवी मंदिर व प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 26 लाख 47  हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 11 मधील नाला ट्रेनिंग करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 36 हजार रुपयांच्या खर्चास, च-होली येथील ताजणेमळा, पठारेमळा, कोतवालवाडी परिसरातील रस्ते डाबंरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 98 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध ठिकाणी सन 2018-19 करीता स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 33  लाख 72  हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. 19 मधील भाटनगर, बी ब्लॉक परिसरात इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण नलिका टाकणे व जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 35 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास, ‘अ’ क्षेत्रीय कार्यलयातर्गत प्रभाग क्र.19 मधील जलनि:सारण नलिका व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे 34 लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास,  पिंपळे सौदागर व इतर परिसरात जलनि:सारण नलिकांची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मुख्य चौकात आवश्यकतेनुसार सिग्नल बसविण्यासाठी येणा-या सुमारे 36  लाख 84  हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.20 मधील महात्मा फुले नगर वसाहत लांडेवाडी वसाहत व उर्वरित परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख 46  हजार रुपयांच्या खर्चास,  प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्त्यांचे खडीकरण व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा- या सुमारे 28  लाख 57 हजार अशा 19  कोटी 16 लाख 28 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.