Maval : आढले खुर्द गावात 20 घोणस सापांना जीवदान

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील आढले खुर्द गावात घोणस जातीच्या 20 सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी व झाकीर शेख यांनी जीवनदान दिले.
मंगळवारी (दि. 20) सकाळी आढले गावात तेजस रामदास भालेसेन यांच्या घराच्या आवरात बाथरुम जवळ त्यांच्या आईला काही सापांची पिल्लं दिसली. त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला संपर्क साधला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी व झाकीर शेख त्या जागी पोहचले. दोन तासात त्यांनी घोणस जातीचे 20 पिल्लं आणि मादी सुखरूप रेस्क्यु केली.
याबाबत त्यांनी वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव व वन्यजीव रक्षक मावळ (Maval) संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली. त्यानंतर त्या सापांना जंगलात सुखरूपपणे सोडून दिले.

घोणस हा मावळ भागातला एक विषारी साप आहे. हा साप अंडी घालत नाही. जून महिन्यात घोणस सापाची मादी पिल्लं जन्माला घालतात. ही मादी 15-70 पिलांना एका वेळी जन्माला घालू शकते. मागील वर्षी जून महिन्यात तळेगाव येथून घोणस जातीच्या सापाची 25 पिल्लं आणि मादी आढळली होती. त्यांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी जीवनदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले होते. घोणस साप चीडल्यावर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो. असे करून तो त्याच्या जवळ येऊ नये अशी सूचना देतो.
जिगर सोलंकी म्हणाले, “घोणस जातीच्या सापाची पिल्लं जन्मताच विषारी असतात. त्यामुळे पिल्लं समजून कोणीही पकडू नये.”
रात्रीच्या वेळी बाहेर जाताना टॉर्च व बुटाचा वापर करावा. कोणताही साप न मारता जवळ पासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.