PCMC : आयुक्त शेखर सिंह शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी साधणार संवाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC) कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त शेखर सिंह हे ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतात. या ऑनलाईन कार्यक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न आयुक्तांपर्यंत पोहोचतात तसेच त्या प्रश्नांना प्रतिसाद दिला जातो.

या महिन्यामध्ये 23 जून शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि इतर सर्व नागरिकांकरिता हा विषय महत्त्वाचा (PCMC) आहे. ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://bit.ly/DialoguewithCommissionerqreg किंवा आजच डाउनलोड करा पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप आणि सर्व्हे टॅब मध्ये जाऊन आपल्या सूचना आयुक्तां पर्यंत पोहोचवाता येतील.

Maval : आढले खुर्द गावात 20 घोणस सापांना जीवदान

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.