अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-यासह दोघे जेरबंद; वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – चांदखेड ता. मावळ येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-यासह दुचाकी चोरणा-या दोघांना वडगाव मावळ पोलिसांनी राऊतवाडी, करूंज येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. आणि इतर आरोपीच्या ताब्यातून  दोन दुचाकी हस्तगत केल्या.

बाळासाहेब दादू वाघे (वय-25, रा. राऊतवाडी करुंज ता. मावळ जि. पुणे), दत्ता मंगेश वाघमारे (वय-20 रा. राऊतवाडी करुंज ता. मावळ, जि. पुणे) आणि संजय रामा वाघमारे (वय-20 रा. सदर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बाळासाहेब वाघे याने चांदखेड येथील एका सतरा वर्षीय मुलीस पळून नेले होते. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडगाव मावळ पोलिसांनी संबंधित मुलगी आणि आरोपीला तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

फिर्यादी शंभु बबन कुडेकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि  संतोष वसंत ओझरकर (रा. वडगाव) यांच्या दुचाकी चोरी गेलेल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी वडगाव आणि तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अन्य दोन आरोपींकडून चोरी गेलेल्या दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

ही कामगिरी पोलास निरीक्षक लोणीकर व त्यांचे पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.