हडपसरच्या म्हाडा कॉलनीत गुंडांचा हैदोस, मारहाण व वाहनांची तोडफोड (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – खुनाच्या गुन्ह्यातून सुटून आलेल्या गुन्हेगारांनी हडपसर येथील म्हाडा कॉलनीत घरात घुसून लोकांना मारहाण तसेच सर्वसामान्यांच्या गाड्यांची नासधूस करीत काल (रविवारी) संध्याकाळी परिसरात दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे गुंडांचा हा हैदोस एका मोटारीतील कैमेऱ्यात टिपला गेला आहे.

हडपसर येथील म्हाडा काॅलनीमध्ये काही गुंडानी मिळून वाहनांची तोडफोड केली आहे. गुंडांच्या या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत. या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडफोड करणारे गुंड हे एका खून प्रकरणात जामीन मिळवून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यानंतर परत असे कृत्य करणे म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असून या प्रकरणात पोलिसांनीही पुरेसे लक्ष घातले नाही, असा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हडपसर मध्ये पूर्ववैनस्यातून गुंडांच्या टोळक्याने एकाला जबर मारहाण करत परिसरात दहशत माजवून चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून लहान मुले आणि महिलांची आपला जीव वाचवण्यासाठी धांदल उडाली. याप्रकरणी 326, गाड्याची तोडफोड आणि तसेच दहशत माजवणे याप्रमाणे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.