शनिवार, डिसेंबर 3, 2022

पिंपरी-चिंचवड महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘बाय’

एमपीसी न्यूज – पुरेसे संख्याबळ नसल्याने पिंपरी-चिंचवडची महापौर निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

गेली दहा वर्षे एकहाती सत्ता उपभोगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले असून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

सभागृहातील संख्याबळ अपुरे असल्याने केवळ विरोधासाठी विरोध म्हणून महापौर निवडणूक लढवू नये, अशी सूचना पवार यांनी केली. शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी प्रबळ व प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करावे, अशी अपेक्षा पवार यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडे व्यक्त केली.

यासंदर्भातील माहितीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही दुजोरा दिला. महापौर निवडणूक न लढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, मात्र तसा अंतिम निर्णय अजून झालेला नाही, असे ते म्हणाले.

Latest news
Related news