Pune : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार, मुळशी तालुक्यातील घटना

एमपीसी न्यूज – दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींनी पाठलाग करणाऱ्या ( Pune ) पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना   मुळशी तालुक्यातील मुठा  गावजवळ मंगळवारी (दि.23) दुपारी ही थरारक घटना घडली. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले.

नवनाथ निलेश वाडकर( वय 18 रा.जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील आरोपी आहे.

Talegaon : तळेगावमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नवनाथ वाडकर सराईत गुन्हेगार आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. तो मुठा परिसरात पिस्तूल घेऊन आला असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन मोटारींतून त्याच्या मागावर गेले.

एनडीए रस्ता येथे तो दुचाकीवरुन साथीदारासह जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यावर त्याने पोलिसांवर पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ती कोणाला लागली नाही. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर गाडी त्याच्या दुचाकीला आडवी घालून दोघांनाही ताब्यात ( Pune ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.