कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इंजिनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्याच्या दिशेने जाणा-या रेल्वे इंजिनची धडक लोहमार्ग ओलांडणा-या एका तरुणाला बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ आज (मंगळवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

 

मयत तरुणाची ओळख अद्याप पटली नसून त्याचे अंदाजे वय 25 आहे. या तरुणाची उंची पाच फूट पाच इंच असून रंगाने काळा सावळा आहे. त्याने अंगात निळ्या रंगाची जीन्स, काळ्या पांढ-या रंगाचा चौकडी शर्ट, राखाडी रंगाचा बनीयन, उजव्या हातावर बोकडाचे चित्र गोंदलेले आहे. गळ्यात लाल रंगाचा धागा आहे.

 

या तरुणाविषयी कोणाला काही माहित असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.