भिंत कोसळून मुलगा गंभीर जखमी झाल्या प्रकरणी घर मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – संत तुकारामनगरमध्ये जुन्या घरावर सुरू असलेल्या वाढीव बांधकामाची भिंत पडून काल (गुरुवारी) एक 14 वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात संबंधित घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनवर उस्मान शेख (वय.40) असे बांधकाम करणा-या घऱमालकाचे नाव आहे. काल शेख यांच्या घराची भिंत पडून निनाद सुधीर गोनते (वय 14 रा. संत तुकारामनगर) हा जखमी झाला होता.

किराणा दुकानातून निनाद बिस्कीटचा पुडा आणण्यासाठी गेला होता. मात्र परतत असताना अचानक इमारतीच्या दुस-या मजल्याचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाची भिंत कोसळली. त्यात निनादच्या डोक्याला जबर मार लागला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कासारवाडी येथील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या घटनेमध्ये इमारतीजवळ लावलेल्या अनेक दुचाकींचेही नुकसान झालेले आहे.

याप्रकरणी शेख याच्यावर गंभीर दुखापतीस कारण ठरल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.