पिंपरी पालिकेतर्फे बुधवारी निगडीत ढोल-ताशा पथक, संघ स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त येत्या बुधवारी (दि. 2) रोजी सकाळी ढोल-ताशा पथक/संघ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीतील, भक्ती-शक्ती चौकात बुधवारी सकाळी आठ वाजता या स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे- नियोजित स्पर्धा ही एकदिवसीय आहे. पथक अथवा संघाने दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रत्येक पथकास वादकांचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. प्राथमिक फेरीचे वादन नऊ मिनिटे व अंतिम फेरीचे वादन सात मिनिटे राहील तसेच वैयक्तिक वादनासाठी तीन मिनिटे वाढ मिळेल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. प्रत्येक पथकास अथवा संघास एकूण 30 वादकांचा समावेश करता येईल.

ढोल व ताशा यांची संख्या ही पथकाने ठरवावी. वादनाचे परीक्षण हे ढोल व ताशा यावर राहील. इतर वाद्य वापरण्यास परवानगी असेल परंतु परीक्षणामध्ये त्यांचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेचे नियम व अटी यामध्ये फेरबदल संपूर्ण अधिकार महापालिकेकडे राहील. पथक अथवा संघाने शिस्तीचे पालनकरणे जरुरीचे आहे.

स्पर्धेची बक्षिसे खालीलप्रमाणे
सांघिक बक्षिसे

प्रथम क्रमांक रुपये 25, 000 /- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह
द्वितीय क्रमांक रु 15,000/- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह
तृतीय क्रमांक रु 10, 000 /- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह
चतुर्थ क्रमांक रु. 5,000 /- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह

वैयक्तिक बक्षिसे
उत्कृष्ठ ढोलवादक

रु.2,500 /- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह
उत्कृष्ठ ताशावादक
रु.2,500/- रोख, प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह

या स्पर्धेमध्ये ज्या पथकांना सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात रमेश भोसले 9850161138 व स्पर्धा समन्वयक अमर कापसे 9822116268 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.