पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या 23 शाखांची 6 कोटींनी फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 23 शाखांमधील 50 महिला खातेदारांनी मोबाईल अॅप्लीकेशन आणि युपीआयचा गैरवापर करत खात्यांमधून 6 कोटी 14 लाख रुपये काढून बँकेची फसवणूक केली.

याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी झोनल मॅनेजर निरंजन श्रीपाद पुरोहित (वय-59) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 50 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हा प्रकार 1 डिसेंबर 2016 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत घडला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शहरातील बाजीराव रोड, सोमवार पेठ, कात्रज, हडपसरगाव, फुरसुंगी, चाकण, तळेगाव ढमढेरे यासह तब्बल 23 शाखांतून युपीआय आणि मोबाईल अॅप्लीकेशनचा गैरवापर करत ही फसवणूक करण्यात आली.

शिवाजीनगर पोलिसांनी हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.