समूह संघटिका महिलांच्या कामाची वयाची अट शिथिल करा

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विविध भागात महापालिकेच्या समूह संघटिका म्हणून मागील 10 ते 15 वर्षांपासून काम करणाऱ्या 100 महिलांपैकी 60 ते 70 महिलांना 38 ते 43 ही वयाची मर्यादा लावल्याने घरी बसविण्याची वेळ आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप हे असून वयाची अट शिथिल करावी. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी भरारी संघटनेच्या अध्यक्षा अनघा ठुसे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

यावेळी अनघा ठुसे म्हणाल्या की, सामूहिक संघटिका म्हणून आम्ही मागील कित्येक वर्षांपासून काम करीत आहे. मात्र, कालावधीत सतत सहा महिन्यानंतर  ब्रेक दिला जातो.  त्यानंतर काम मिळेल का नाही. या दबावाखाली काम करावे लागत असून या विषयी महापालिका आयुक्तांकडे अनेक वेळा अर्ज करून देखील आमच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही.

समूह संघटिका महिलांच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्प, भिकारी मुक्त पुणे शहर, हगणदारी मुक्त यासह अनेक प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या काळात कोणत्याही सुविधा पुरविण्यात आल्या नाही. तरी देखील आम्ही काम करीत राहिलो. महापालिका प्रशासनाने वय मर्यादा शिथिल करून तसा ठराव करावा, महिलांच्या आरोग्य आणि  सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा करावी, महागाईनुसार पगारवाढ करावी, सहा महिन्यांऐवजी 11 महिन्यांचा करार करावा. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.