गतीमंद तरुणीवर बलात्कार प्रकरणी 65 वर्षीय ज्येष्ठाला अटक

एमपीसी न्यूज – शेजारी राहणा-या 65 वर्षीय ज्येष्ठाकडून 24 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काल (दि.19) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी दोघेही एकाच वस्तीत शेजारी-शेजारी राहतात. फिर्यादीची मुलगी 24 वर्षाची असून ती गतीमंद आहे. याचा फायदा उचलून आरोपीने तिला घरी बोलवून तिच्या गतीमंदपणाचा फायदा उचलत तिच्याशी जबरदस्तीने संभोग केला. याबाबत पीडितेच्या आईला समजताच त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.