Pune : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीसमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड मधील 131 कायमस्वरूपी कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी या कामगारांनी आज (दि. 29) कुटुंबासहित कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून या कामगारांना बाजूला करून ताब्यात घेतले.

कामावरून काढून टाकलेले कामगार आज कंपनीच्या प्रवेशद्वारावर आपल्या कुटुंबियांसमवेत आज आले होते. कामावर परत घ्यावे यासाठी मागील 41 दिवसांपासून मागणी करीत होते. आज कंपनीचे संचालक राहुल किर्लोस्कर हे प्रवेशद्वारावर आले असताना कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता ते निघून गेले. यामुळे संतप्त झालेले कामगार प्रवेशद्वारावर बसून राहिले.

या कामगारांना तेथून घालवून देण्यासाठी पोलिसांनी या कामगारांवर सौम्य लाठीमार केला. त्यावेळी पोलिसांना अडविण्यास गेलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=4fRMWbXNTsk&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.