Chinchwad : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावरच देश बदलू शकतो – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अशोक नगरकर

एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ जागतिक गणितज्ञ डाॅ. श्रीनिवास रामानुज यांच्या जयंती निमित्त पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे विज्ञान विषयावर डॉ. नगरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, प्रा दिंगबर ढोकले, संस्थेचे सदस्य अशोक पारखी, गतिराम भोईर, आसाराम कसबे, प्रा नीता मोहिते, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, अतुल आडे तसेच चिंचवड व थेरगाव विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी युवा वैज्ञानिक अंकिता नगरकर हिला 12 पेटंट मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

नगरकर यांनी आपल्या व्याख्यानातून अनेक शोधांची उदाहरणे दिली. पोइंटर पेन पेन ड्राइव एकाच पेन मध्ये, एकाच बॉटलमध्ये दोन द्रव पदार्थ इ. तसेच जेष्ठ शात्रज्ञ एडिसन यांनी लावलेल्या शोधांबद्दल माहिती सांगितली. यावेळी सौ.नगरकर व त्यांची कन्या युवा शात्रज्ञ कु.अंकिता नगरकर हिने देखील स्वत: लावलेल्या वैज्ञानिक शोधाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. छोट्या पण रोजच्या जीवनात लागणार्‍या स्टेपलरच्या पिना संपल्यावर कामाचा खोळंबा होतो त्यावर पर्याय म्हणून स्टेपलरच्या पिनाना शेवटी रंग लावल्यास पिना संपत आल्याचे लक्षात येते. अशी अनेक उदाहरणे देऊन दैनंदिन व्यवहारात छोटे छोटे शोध आपणच कसे लावू शकतो हे शिकवले.

गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी व शिक्षकांनी निर्भीडपणे आपले मत व्यक्त करावे व न्यूनगंड मनात बाळगू नये असे सांगितले. संस्थेचे कार्यवाह अॅड सतीश गोरडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी गोरडे यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील चित्रपटासाठी २५ हजारांची देणगी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.