Pimpri : आजच्या शिक्षणात अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्थेचा अभाव- गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – इंग्रजांनी आणलेल्या शिक्षणात अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि संस्कृतीचा (Pimpri ) अंतर्भाव केलेला नाही.  आजच्या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थी कर्तृत्ववान बनले मात्र कुशल बनले नाही. त्या काळात महात्मा गांधी इंग्रजांना म्हणाले की, तुमचे शिक्षण हे  कुशलतेकडून अकुशलतेकडे नेणारे आहे, असे मत गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

Madhya Pradesh CM : मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या हाती मुख्यमंत्री पदाची कमान

पिंपरी-चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शहरातील आदर्श शाळा,गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, कॅंप एज्युकेशन रसिकलाल धारीवाल व्यवस्थापन कॉलेजचे संचालक डॉ भरत कासार,कॅंप एज्युकेशन निगडी संकुलाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी इथापे , पिं.चिं. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, सचिव संभाजी पडवळ, कार्याध्यक्ष अशोक जाधव, खजिनदार बाबाजी शिंदे, सहसचिव  हनुमंत मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहरातील 4 शाळा, 9 मुख्याध्यापक, 16  शिक्षक, 7  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे  प्राचार्य सुबोध गलांडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष काळे यांनी आभार मानले.नाना शिवले, गौतम दळवी यांनी सूत्रसंचलन (Pimpri ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.