Madhya Pradesh CM : मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या हाती मुख्यमंत्री पदाची कमान

एमपीसी न्यूज : मध्य प्रदेशात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा (Madhya Pradesh CM )अखेर आज करण्यात आली आहे. भाजपने यंदा मोहन यादव यांच्या हाती मध्यप्रदेशची कमान देऊन मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. 

आज झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांची निवड करण्यात आली. या बैठकीनंतर मध्य प्रदेशच्या पुढील मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस सर्वांसमोर जाहीर झाला.  काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराशिवाय निवडणूक लढवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू होती.

Pimpri :  पिंपरी-चिंचवडमध्ये बर्न हॉस्पिटल उभारावे; आमदार महेश लांडगे यांची अधिवेशनात मागणी

विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.  (Madhya Pradesh CM)

खासदार सीएम पदाच्या शर्यतीत अनेक मोठी नावे होती. ज्यामध्ये प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, व्हीडी शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, कैलाश विजयवर्गीय अशा अनेक नावांचा समावेश होता. भाजपने सर्वांना चकित करत मोहन यादव यांना नवे मुख्यमंत्री घोषित केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.