Talegaon Dabhade: कृष्णराव भेगडे शालेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले.
कु.सिद्धी विजय रहातेकर हिने 93 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु.वैष्णवी दशरथ शिंदे हिला 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर कु.श्रेया हनुमंत ढोरे हिने 91.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कु.पार्थ पराग कुंभार या विद्यार्थ्याला गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक श्री.चंद्रकांत काकडे, अध्यक्ष श्री.संदीप काकडे , शाळेचे अध्यक्ष श्री.डॉ. दिलीप भोगे व इतर सर्व सभासदांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मीना अय्यर यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन केले.