Today’s Horoscope 19 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – सोमवार दि. 19 जुलै 2021
- शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
- आज विशेष – साधारण दिवस.
- राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
- दिशा शूल – पूर्वेस असेल.
- आजचे नक्षत्र – विशाखा.
- चंद्र राशी – तुळ 16.54 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————————
आजचे राशीभविष्य.
मेष – ( शुभ रंग मोरपिशी)
आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. सतत कामामुळे दिवस कंटाळवाणा जाईल. मोफत सल्ला देणारी माणसे बोअर करतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.
वृषभ – ( शुभ रंग जांभळा )
इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज संध्याकाळी लवकर घर गाठा. जोडीदार आज आतुरतेने वाट पाहात असेल.
मिथुन – ( शुभरंग- मरून )
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.
कर्क – ( शुभ रंग- मोतिया )
आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.
सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.
कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.
तूळ – ( शुभ रंग- केशरी )
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील.
वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )
दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.
धनु – ( शुभ रंग- पिस्ता)
कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.
मकर – ( शुभ रंग- आकाशी )
आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.
कुंभ – ( शुभ रंग- हिरवा )
काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. आपल्या पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या.
मीन – ( शुभ रंग- पांढरा)
ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.