Maharashtra Corona Update : राज्यात आज नऊ हजार नवे कोरोना रुग्ण, 180 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) नऊ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या एक लाख 03 हजार 486 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 7 हजार 761 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 14 हजार 190 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 80 हजार 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आज 5 हजार 756 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रात आज 180 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 27 हजार 031 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.24 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 54 लाख 81 हजार 252 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 67 हजार 585 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 066 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.