Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर आज (रविवारी) रात्री सोलापूरमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी भीम आर्मीचे अजय मंदिर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना काळे झेंडे दाखवून  भीम आर्मीच्या वतीने खाजगीकरणाच्या विरोधात केली जोरदार निदर्शने करण्यात आली. भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) मोटारीतून उतरल्यावर त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. भीम आर्मीचे कार्यकर्ते अजय मंदिर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यापूर्वी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकण्याचा प्रकार झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच हा दुसरा प्रकार झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.