Today’s Horoscope 16 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 16 October 2023
वार – सोमवार.
16.10.2023
शुभाशुभ विचार- 20 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 19.35 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
————————————
मेष – ( शुभ रंग- आकाशी )
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदाराकडून ही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. आज काही महत्वाचे समाचार येतील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्य विषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे राहील. कुणालाही सल्ले देऊ नका.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
आज तुमच्यात चैनी व विलास वृत्ती बळावेल. कमी श्रमांत जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज तुम्ही हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्याल. सामान्य दिवस.

कर्क (शुभ रंग- राखाडी)
बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले अभ्यास मन लाऊन करतील.

सिंह (शुभ रंग- सोनेरी )Today’s Horoscope 16 October 2023
आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पांत तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कन्या ( शुभ रंग- जांभळा )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट हौसेने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस आगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी )
आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात रहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टाहास राहील. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- गुलाबी)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवास कराल.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता. म्हणजे शुभच होईल. वाणित गोडवा असू द्या.

मकर ( शुभ रंग- गुलाबी)
मित्रमंडळींना दुरूनच रामराम करून आज आपल्या ध्येयप्राप्तीस तुम्ही प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न

मीन (शुभ रंग – मरून )
कमी श्रमात जास्त लाभाची अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही आज दगा होऊ शकतो. सतर्क रहा. आज गाडी चालवताना गाणे गुणगुणू नका.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.