Mumbai : शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे यांच्या कारला अपघात
एमपीसी न्यूज : मुंबईत आमदार आदित्य ठाकरे (Mumbai) यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. दादर येथील शिवसेना भवनाबाहेर एका भरधाव दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्याने हा अपघात घडला. तर अपघातानंतर दुचाकीस्वाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दुचाकीस्वाराची चौकशी करण्यात येत आहे.