Pandharpur : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा संपन्न; यंदाचा मान नेवासातील वारकरी दांपत्यांना!

एमपीसी न्यूज : आज आषाढी एकादशी निमित्त (Pandharpur) पंढरपुर येथे पांडुरंग अन रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक ही पूजा संपन्न झाली तर यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या वारकरी दांपत्यांना पूजेचा मान मिळाला.

हे दोन्ही दाम्पत्य गेल्या 25 वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत. त्यांना देखील नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे, अशी मनोकामना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

तसेच राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा असे मागणे एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी मागितले.  तसेच जनसेवेचा जो वसा त्यांच्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ त्यांना मिळावे अशीही (Pandharpur) इच्छा त्यांनी  व्यक्त केली.

यावेळी मुख्यमंत्री यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच सहकारी मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ‘मागेल त्याला मोफत झाड’ या उपक्रमांतर्गत पाच हजार झाडांचे वाटप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.