Baramati : …म्हणून शरद पवार यांना नमो महारोजगार मेळाव्याचे आमंत्रण दिले नाही!

एमपीसी न्यूज – बारामती येथे 1 आणि 2 मार्च रोजी होणाऱ्या (Baramati) नमो महारोजगार मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे खुलासा करण्यात आला आहे.

हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये, अशा स्पष्ट सुचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही.

Maharashtra : ‘सारथी’ संस्थेमार्फत 47 गड-किल्ल्यांची स्वच्छता

त्यामुळे या कार्यक्रमातही नाव टाकण्यात आले नाही. पण, आता पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात येणार असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Baramati) यांना पवार यांनी बारामतीत येत असल्याबद्दल जेवणाचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला अजित पवार जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.