Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ‘मागेल त्याला मोफत झाड’ या उपक्रमांतर्गत पाच हजार झाडांचे वाटप

एमपीसी न्यूज – मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून (Vadgaon) नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी ‘मागेल त्याला मोफत झाड’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वडगाव नगरपंचायत मागील तीन वर्षांपासून माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात सक्रीय सहभाग घेत असून संपूर्ण वडगाव शहरामध्ये वृक्षारोपण तसेच स्वच्छतेसाठी विविध उपक्रम व उपाययोजना राबविण्यात येत असतात.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका पूनम जाधव, पूजा वहिले, अतुल वायकर, उपाध्यक्षा चेतना ढोरे, सिद्धेश ढोरे, गणेश जाधव, यशवंत शिंदे आदींसह मोरया प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक सदस्य, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि वडगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील नागरिकांनी आपापल्या परिसरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी (Vadgaon) झाडे लावणे काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नागरिकांना आंबा, नारळ, फणस, चिकू, जांब, पेरू, बदाम, जांभूळ, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, बेल, कदंब, कडुनिंब, आवळा इत्यादी पाच ते सहा फूट उंचीची झाडे विनामूल्य वाटप केली जातात.

Talegaon Dabhade : टाळ, मृदंग अन् विठूनामाच्या गजरात इंद्रायणी बी. फार्मसी महाविद्यालयात निघाली दिंडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.