Baramati : शरद पवार यांना मेळाव्याचे आमंत्रण नाही मात्र, त्यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे खास निमंत्रण

एमपीसी न्यूज – शासनातर्फे बारामती येथे 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे  (Baramati) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक मोठे मंत्री उपस्थित असणार आहेत. या दरम्यान शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु, शरद पवार यांना महारोजगार मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. तरीही शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या बारामती येथील घरी म्हणजे गोविंदबाग येथे जेवणाचे निमंत्रण दिले आहे. तसेच दूरध्वनी करूनही त्यांनी कळविले आहे. 

या महारोजगार मेळाव्यात विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे  आहेत. पण, राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत नाहीत. त्यांना या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील देण्यात आलेले नाही.

Pune: यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा – सचिन चिखले

 

त्यामुळे नाव वगळूनही शरद पवार यांच्याकडून जेवणाचे आमंत्रण गेल्याने पत्राची जोरदार (Baramati) चर्चा होत आहे. पवारांच्या आमंत्रणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय उत्तर देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील बारामतीत आल्यावर पवारांनी त्यांना घरी जेवणासाठी बोलवले होते, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. ज्या विद्या प्रतिष्ठानची स्थापना शरद पवार आणि इतरांनी मिळून 50 वर्षांपूर्वी केली होती. त्याच ठिकाणी हा कार्यक्रम होतो ही आनंदाची बाब असल्याचे सुळे यांनी सांगितले. नाव वगळले असले तरी आमच्याकडे अतिथी देवो भव: अशी संस्कृती असल्याने आम्ही सर्वांना जेवायला बोलावतो अशी प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.