Maval LokSabha Election : मतदान अधिकारी कर्मचारी यांना दुसरे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – 13 मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी  पिंपरी विधानसभा ( Maval LokSabha Election) कार्यालयांतर्गत नियुक्त करणात आलेले अधिकारी आणि कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले.

अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख तसेच नोडल अधिकारी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणे, केंद्रप्रमुख, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देशमुख यांनी अधिकारी कर्मचा-यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.  तसेच मतदानाच्या दिवशीच्या मतदान केंद्रावरील प्रकियेचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये नोडल आफिसर, सेक्टर ऑफीसर यांनी मतदान अधिकारी यांचे कर्तव्य कसे पार पाडाययचे याचे अभिनयाना द्वारे सादरीकरण केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या निवडणुक प्रशिक्षणासाठी 1837इतके प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी करावयाचे कामकाज कर्तव्य व अनुषंगाने प्राप्त अधिकार त्याप्रमाणे EVM VVPAT हाताळणी, जुळणी याबाबत सर्व सेक्टर ऑफीसर यांनी एकत्रीतपणे नाटीका सादर करून कामकाजाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

Pune : ‘वंदे माँ भारती’ या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण

यामध्ये अभिरूप मतदान घेणे, कंट्रोल युनिट व VVPAT मोहेरबंद करणे, घोषणापत्र तयार करणे, प्रदत्त मतदान नोंदविणे  अंध, दिव्यांग, जेष्ठनागरिक,गैरहजर-स्थलांतरीत-मयत (ASD), तृतीयपंथी, परदानशीन, आक्षेपित मत नोदंविणेबाबतचे सहमतीपत्रे व घोषणापत्रे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करणेत आले. तसेच मतदान संपलेनंतर पुरूष, महिला, तृतींयपंथी व एकुण मतदान टक्केवारी यांची नोंद घेणे, संविधानिक /असंविधानिक पाकिटे भरणे, नोंदविलेल्या मताचा हिशोब, केंद्राध्यक्षाची दैनदिंनी, PS-O5, केंद्राध्यक्षांचे छाननी तक्ता, केंद्राध्यक्षांचा अहवाल 1 ते 5 आणि 16 मुद्द्यांचा अहवाल भरावयाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले यामुळे प्रशिक्षणार्थी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया  समजल्याचे समक्ष सांगीतले असल्याचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे.

प्रात्यक्षिकामध्ये मनोज सेठीया,उज्वला गोडसे, अनघा पाठक, वैशाली ननावरे, दिलीप धुमाळ, विजय भोजने, मनोहर जावराणी, किरण अंदुरे,जयकुमार गुजर, शिवाजी चौरे, दिपक पाटील, प्रताप मोरे, लक्ष्मीकांत कोल्हे, हरविंदसिग देसाई, हेमत देसाई, दिनेश फाटक, चंद्रकात कुंभार, वृषाली पाटील, प्रशांत कुंभार, रोहीनी आंधळे, सुधीर मरळ, चंद्रकला शेळके, सरिता मारणे, अनिता चेमटे, सुवर्णा शिवशरण, अंजली खंडागळे,सुप्रिया सुरगुडे या व इतर सेक्टर ऑफीसर अधिकारी कर्मचारी यांनी मतदारांची पात्रे साकारली.

प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वरूपात अतिशय सुंदर पध्दतीने देण्यात आले. प्रात्यक्षिक करणारे कलाकार (अधिकारी वर्ग) यांनी सहज सुंदर व सोप्याभाषेत हसत खेळत सादरीकरणे केले याप्रक्षिणामुळे निवडणूक कामकाजात काहीच चुका होणार नाहीत असे वाटते. तसेच निवडणूक कामकाजात तणाव निघुन गेल्यासारखे वाटले
शरद शेळके, प्रशिक्षणार्थी

मी आजतागायत 3 मतदान ड्युटी केली पण इतकी व्यवस्थीतरित्या समजले नव्हते पण सादरी करणामुळे ( Maval LokSabha Election) व्यवस्थीत समजले व टेन्शन कमी झाले.

सायली वागदरेकर, प्रशिक्षणार्थी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.