लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, MPSC करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एका अभ्यासिकेत एकत्र काम करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या व्यक्ती विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार रुपेश राजाभाऊ व्हावळे (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

talegaon dabhade news: इंदोरी येथील एका तरुणाचा खून

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. एकाच अभ्यासिकेत ते एकत्र अभ्यास करत असताना त्यांची ओळख झाली होती. दरम्यान ओळखीच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान काही दिवसांनी फिर्यादी यांनी आरोपी तरुणाकडे लग्नाविषयी विचारणा केली असता त्याने फिर्यादी तरुणीला हाताने मारहाण केली. यानंतर फिर्यादी तरुणीने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.