Pune : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार व तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने ( Pune) तरुणीवर बलात्कार करत तिच्याकडून 3 लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार जुलै 2019 ते  सप्टेंबर 2022 या कालावधीत भोसरी, हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली असून राकेश रविंद्रनाथ नायर (वय 22 रा.भोसरी) याच्या विरोधात आर्थिक फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cannes Film Festival : कान्स चित्रपट महोत्सवात मराठीतील तीन चित्रपटांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले होते. फिर्यादीच्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले तसेच पीडितेकडून वेळोवेळी अंदाजे 3 लाख रुपये देखील घेतले. पुढे त्यांना पीडितेला शारीरिक व मानसीक त्रास दिलाय (Pune) यावरून भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.