Nigdi : कारला धक्का लागला म्हणून ट्रॅव्हल्स चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कारला धक्का लागला या कारणावरून सहा ते सात (Nigdi ) जणांनी ट्रॅव्हल्स चालकाला बेदम मारहाण केली आहे. हि घटना निगडी गावठाण येथे  रविवारी (दि.9) रात्री घडली आहे.

याप्रकऱणी निगडी पोलिसांनी गणेश लुक्कर व पप्पू लुक्कर यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस ठाण्यात बाळासाहेब गणपती फडनीस (वय 67 रा.कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : लग्नाचे आमिष दाखवून तरुणावर बलात्कार व तीन लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोल्हापूरसाठी प्रवासी घेण्याकरता रोडवर थांबले असता त्यांच्या बसच्या मागे थांबलेल्या कार मधील चार इसम खाले आले वत्यांनी तू आमच्या कारला धक्का का मारला म्हमूण भांडण्य़ास सुरुवात केली.

यावेळी निशांत ट्रॅव्हल्सचे बंडू काळभोर हे भांडणे सोडविण्यासठी आले असता  गणेश याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेत फिर्यादी व बंडू यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी तसेच ब्लॉक फोकून मारून जखमी केले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस (Nigdi ) पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.