Chakan News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून 26 वर्षीय तरुणीवर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केल्या प्रकरणी एकावर चाकणपोलीस ठाण्यात सोमवारी (दि.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 28 मे 2022 रोजी चाकण येथे घडला.

26 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सतिश सुधाकर मुंडणकर (रा. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri News: शहरातील खासगी रूग्णालयांना राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून परवाना घेता येणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना भेटायला बोलावून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी नकार दिला असतानाही आरोपीने फिर्यादीशी त्यांच्या इच्छेविरोधात शारीरिकसंबंध ठेवले व त्यांची फसवणूक केली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याचा चाकण पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.