Criminal Arrested : नारायणगाव पिंपरी कावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आठ महिने फरार आरोपीला गुजरात राज्यातून अटक

एमपीसी न्यूज : नारायणगाव पोलीस ठाणे व स्थानिक पुणे शाखा यांच्या संयुक्त कामगिरीमध्ये नारायणगाव पिंपरी कावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आठ महिने फरार असलेल्या आरोपीला गुजरात राज्यातून जेरबंद करण्यात आले आहे.

मन्ना उर्फ सुरज सिंग, मूळ रा. पंजाब सध्या रा. वडोदरा, गुजरात या आरोपीचे नाव आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत 9 मार्च 2022 रोजी रात्रीच्या सुमारास मौजे कावळ पिंपरी गावच्या हद्दीत रोहिदास पाबळे, 38 वर्षे, रा. पिंपरी कावळ गाव याची जमिनीच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून राहत्या घराच्या पाठीमागे चार ते पाच इसमांनी मानेवर, डोक्यावर, पोटावर व पाठीवर मारून निर्घृण हत्या केली होती. याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 302, 120 ब, 143, 148, 149, आर्म ऍक्ट 3(25), 4(25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Chainsnatching: गाडी आणि फ्रीज बक्षीस मिळाले म्हणत पळवली पाणे दोन लाखांची सोनसाखळी

आरोपी मन्ना सिंग हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. अंकित गोयल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपीला तात्काळ अटक करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासात कळाले की फरार आरोपी हा गुजरात राज्यात आहे. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता कळाले की तो वेषांतर करून गुजरात राज्यात वावरत आहे व तो तेथील एका कंपनीत कामाला जात आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने तपास पथक गुजरात राज्यात गेले. या तपास पथकणे तांत्रिक मदतीच्या आधारे व वेषांतर करून त्या आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व्ही तो मी नव्हेच असे बोलून तपासात सहकार्य करत नसल्याने त्याला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे अधिकची चौकशी केल्यावर त्याने त्याचे ना मन्ना उर्फ सुरज सिंग, वय 23 वर्षे, रा. तर्न तरन, पंजाब असे असल्याचे सांगितले. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने रोहिदास पाबळे, रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे याचा धारदार शस्त्राने व्ही अग्निशस्त्र (पिस्टल) च्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.