Nigdi News: ‘दिवाळी विसावा’ला रसिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शहर संघटिका सरिता अरुण साने यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘दिवाळी विसावा’ कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

निगडी, प्राधिकरणातील वाढोकर सभागृहात 12 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. दिवाळी नंतर रसिकांना सांगीतिक मेजवानी द्यावी. या हेतूने गेली 5 वर्षे त्या या कार्यक्रमाचे नियोजन करतात. मोहन कुलकर्णी यांचा उत्कृष्ट संच यावर्षी निवडला होता. गफार मोमीन, मोनाली दुबे, अमोल यादव, मनीषा निश्चल हे अतिशय गुणी गायक आणि मनीष आपटे हा हरहुन्नरी निवेदक यांनी अतिशय सुरेख कार्यक्रम केला.

स्वाती धोकटे या नृत्यांगनेनी बहारदार नृत्ये सादर करून कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. झुमका गिरा रे पासून ए मेरे वतन के लोगो पर्यंत आणि गुलाबी आंखे पासून मेरे रशके कदम पर्यंत अनेक नव्या जुन्या गाण्यांनी धमाल आणली. मराठी गाण्यांच्या समावेशमुळे रसिक खुश झाले. मनवा लागे,अधीर मन झाले,हीच आमुची प्रार्थना अशा मराठी गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सईद खान यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संगीत संयोजन केले होते. सरिता साने यांच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिफीतही यावेळी दाखविण्यात आली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्योती कानेटकर यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. भावना फुलझडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.