Pimpri : वीजग्राहकांकडे  124 कोटी 77 लाखांची थकबाकी

थकीत वीजबिल भरा अन् वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळा, महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज –  पुणे परिमंडलातील पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी ( Pimpri)  आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येत असल्याने थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. स्वतः मुख्य अभियंता  राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.

पुणे शहरात एकूण 2 लाख 54 हजार 911 वीजग्राहकांकडे 46 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 2 लाख 17 हजार 625 ग्राहकांकडे 32 कोटी 32 लाख रुपये, वाणिज्यिक 34 हजार 869  ग्राहकांकडे 11 कोटी 64 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 417 ग्राहकांकडे 2 लाख 67 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 9 हजार 726 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

Rituraj Gaikwad : ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 1 लाख 45 हजार 622 वीजग्राहकांकडे 32 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 23 हजार 486 ग्राहकांकडे 19 कोटी 93 लाख रुपये, वाणिज्यिक 18 हजार 491 ग्राहकांकडे 8 कोटी 28 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 645 ग्राहकांकडे 3 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 4 हजार 539 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण 1 लाख 86 हजार 753 वीजग्राहकांकडे 45 कोटी 94 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 67 हजार 17 ग्राहकांकडे 32 कोटी 87 लाख रुपये, वाणिज्यिक 17 हजार 313 ग्राहकांकडे 8 कोटी 59 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 423 ग्राहकांकडे 4 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 4 हजार 687 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे ( Pimpri)  व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 23) व रविवारी (दि. 24) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.