Rituraj Gaikwad : धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी निवड

एमपीसी न्यूज – ऋतुराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी ( Rituraj Gaikwad)  निवड करण्यात आली आहे.आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) नवा सीझन सुरू होण्यास अवघे काही दिवस असतानाच महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. त्या धक्क्यातून सावरत संघ व्यवस्थापनानं लगेचच भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची यंदाच्या मोसमासाठी कर्णधारपदी निवड केली आहे.

Pune : फ्लाइटमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचे डॉक्टर, केबिन क्रू्च्या मदतीने वाचले प्राण

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघात मोठा बदल करण्यात आला आहे. धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कर्णधारांच्या फोटोशूटलाही हजेरी लावली नाही. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड दिसला, तेव्हापासून CSK च्या कर्णधार बदलाची चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी आयपीएलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये पुष्टी केली की ,धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार ( Rituraj Gaikwad) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.